अनिल परब यांना कर्मचारी व कामगारांचा लागला श्राप- सदाभाऊ खोत

Update: 2021-09-02 12:30 GMT

पंचायत राज समितीच्या सदस्य सदाभाऊ खोत हे सध्या नांदेड दौऱ्यावर ती असून त्यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्याबाबत संवाद साधला यावेळी अनेक एसटी कामगार व चालक उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये एस. टी महामंडळच्या कर्मचाऱ्यांनी कोवीड काळामध्ये काम करत असताना यांचा मृत्यू झाला अशा आणि ज्या कर्मचाऱ्यांनी उपासमारीची वेळ आल्यानंतर आत्महत्या केल्या आहेत अशांना दहा लाख रुपयांची शासनातर्फे मदत देण्यात यावी व त्यांच्या घरातील एका व्यक्तीस एसटी महामंडळमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत करावे असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, या गोष्टीसाठी मी शासनाकडे पाठपुरावा करील व मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे कोणत्याही कर्मचाऱ्यांनी यापुढे आत्महत्या करू नये.

दरम्यान एकीकडे ईडीच्या चौकशीवर असलेले अनिल परब यांना लोकांचा श्राप लागला आहे, एसटी कामगार धुळी मध्ये मातीमध्ये काम करून सुद्धा त्यांना वेळेवर पगार होत नाही आणि त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कशी असा प्रश्न सर्वसामान्य एसटी कर्मचारी व कामगार करत आहेत.

Tags:    

Similar News