किरीट सोमय्या हजर व्हा : अनिल परब बदनामी प्रकरणी हायकोर्टाचं समन्स

अनिल परब विरोधी किरीट सोमय्या वाद आता विकोपाला गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कथित अनधिकृत बांधकाम प्रकरणी ट्विटरवरुन बदनामी केल्याबद्दल महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपनेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असून आज हायकोर्टानं किरीट सोमय्या यांना समन्स बजावत 23 डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Update: 2021-10-01 14:04 GMT

जून २०२१ मधे किरीट सोमय्या यांनी रत्नागिरी जिल्हयातील अनधिकृत बांधकामाबद्दल अनिल परब यांच्यावर टि्विट करुन आरोप केले होते. या बांधकामाशी मंत्री परब यांचा कोणताही संबध नाही. कुठल्याही संस्थेने या प्रकरणी त्यांना नोटीस दिलेली नाही. किरीट सोमय्या यांच्या टि्वटनंतर सर्व प्रकारणच्या मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधे यासंबधीची वृत्तं छापून आली. त्यामुळे पत्रकार, सहकारी, सरकार आणि पक्षामधे नाहक बदनामी झाल्याचे परब यांनी याचिकेत म्हटलं आहे.

एवढी बदनामी करुन सोमय्या थांबले नाही तर त्यांनी परब यांच्यावर खंडणीचा आरोप करुन तरुंगात डांबण्याची धमकी दिली होती.याबाबत अनिल परब यांनी कायदेशीर नोटीस पाठवून टि्विट डिलीट करण्याची मागणी केली होती. परंतू सोमय्यांनी या नोटीसला साधे उत्तरही दिले नाही असं परब यांनी याचिकेत म्हटलं आहे.

१०० कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याबरोबरच बिनशर्त माफी आणि प्रमुख भाषिक- इंग्रजी वृत्तपत्रात माफीनामा प्रसिध्द करण्याची मागणी हायकोर्टात केली आहे. त्याशिवाय किरीट सोमय्यांना कायमस्वरुपी बदनामीकारक वक्तव्य आणि आरोप करण्यावर हायकोर्टानं बंदी घालावी अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.

परब यांनी नोटीस पाठवल्यानंतर सोमय्या यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. अनिल परब यांच्या दाव्याला आपण भीक घालत नाही. आता शिवसेनेला असं वाटणार नाही की फक्त आमचेच घोटाळे बाहेर काढतात. आता विदर्भातील काँग्रेसचे मंत्री टार्गेटवर असल्याचा इशाराच सोमय्या यांनी दिला होता. कोट्यवधी रुपयांचे घोटाळे बाहेर येणार आहे. एनसीपी परिवारातील एक मोठा घोटाळा बाहेर येणार आहे, असं सोमय्या म्हणाले.

Tags:    

Similar News