अनिल अंबानींवर पत्नीचे दागिने विकण्याची वेळ, राफेलमधील ऑफसेट कंत्राटाचे काय?

Update: 2020-09-26 09:28 GMT

देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी लंडनमधील एका कोर्टात आपल्याकडे आता पैसा शिल्लक नसल्याचं सांगितलं आहे. न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आपण आपल्या पत्नीचे सगळं सोने विकले असून आता काहीही शिल्लक नाही, अशी माहिती अनिल अंबानी यांनी इंग्लंडमधील कोर्टात दिली आहे. आपल्याकडे केवळ एकच कार असल्याचेही त्यांनी सांगितलेले आहे.

गेल्या काही महिन्यात आपण पत्नीचे दागिने विकून नऊ कोटी 90 लाख रुपये उभे केले आणि ते न्यायालयीन लढ्यासाठी वापरले असही अनिल अंबानी यांनी कोर्टात सांगितले. चीनमधील बँकांसोबत सुरू असलेल्या कर्जासंबंधीच्या वादात अनिल अंबानी यांनी इंग्लंडमधल्या कोर्टात ही माहिती दिली.

चीनमधील तीन बँकांकडून 4 हजार 707 कोटी रुपये अनिल अंबानी यांनी कर्ज घेतले आहे. यासंदर्भात चीनमधील बँकांनी आपली संपत्ती घोषित करा असे अनिल अंबानी यांनी सांगितले आहे.

दरम्यान अनिल अंबानी यांच्या या माहितीवर प्रशांत भूषण यांनी ट्विट केलेले आहे. ज्या माणसाकडे पैसा नाही असं तो कोर्टात सांगतो, त्याला पंतप्रधान मोदी यांनी तीस हजार कोटींचे ऑफसेट कंत्राट कसं काय दिले, असा सवाल प्रशांत भूषण यांनी विचारलेला आहे.

राफेल व्यवहारा मधल्या ऑफसेट करारांपैकी 30 हजार कोटींचे कंत्राट अनिल अंबानी यांना देण्यात आलं होतं. आणि याच मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी मोठ्या प्रमाणात रारान उठवले होते.

Similar News