चालत्या एक्स्प्रेसमधून उतरताना पडल्याने फरपटत जाणाऱ्या प्रवाशाला आरपीएफ जवानाने वाचवले

Update: 2021-11-18 11:44 GMT

कल्याण  // चालत्या एक्स्प्रेस रेल्वेतून उतरताना गाडीचा वेग वाढल्याने गाडीतून पडून फरपटत जाणाऱ्या प्रवाशाला आरपीएफ जवान व  रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत वाचवल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली आहे. हा संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे सतर्कता दाखवणाऱ्या आरपीएफ जवान व रेल्वे कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

युनिस खान हे 54  वर्षीय गृहस्थ गुरुवारी सकाळी 9 वाजून 26  मिनिटांनी कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या मुंबई लखनऊ एक्स्प्रेसने जाणाऱ्या आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी स्थानकात आले होते. नातेवाईकाचे सामान गाडीत ठेवण्यासाठी ते गाडीत चढले. मात्र, यानंतर गाडीतील गर्दी वाढल्याने त्यांना वेळेत गाडीतून खाली उतरता आले नाही. इतक्यात फलाटावरून सुटलेल्या गाडीने वेग पकडल्याने चालत्या गाडीतून उतरणारे युनिस खान यांचा पाय घसरल्याने ते गाडीबरोबर फरपटत जाऊ लागले. यावेळी फलाटावर ड्युटीवर असलेले उपनिरीक्षक अनिल कुमार प्रधान, आरक्षक शेषराव पाटील, आरक्षक आर के यादव, विकास साळुंखे यांनी या प्रवाशाला गाडीबरोबर फरपटत जाताना पाहताच तातडीने धाव घेत त्याला वाचविले. खान याना किरकोळ दुखापत झाली आहे.आपला जीव वाचविणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांनी धन्यवाद दिले.  मागील 5 महिन्यात कल्याण रेल्वे स्थानकातील रेल्वे कमर्चाऱ्यांनी विविध 6 घटनामध्ये मेल एक्स्प्रेसमधून पडलेल्या प्रवाशाचा जीव वाचवला आहे

Tags:    

Similar News