आपल्यातील भांडणं विसरूया अमृता फडणवीसांचं उद्धव ठाकरेंसाठी ट्वीट

Update: 2020-02-06 13:44 GMT

हिंगणघाट येथे एका शिक्षिकेला भरचौकात जाळले. या घटनेमुळे महाराष्ट्रात या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या विकृत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. अशी मागणी समाजातून केली जात आहे. या संदर्भात आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटर वरुन टीका केली आहे. मात्र, टीका करण्याच्या नादात अमृता फ़डणवीस यांच्याकडून पीडितेच्या नावाचा उल्लेख झाला आहे. अमृता फडणवीस यांनी या संदर्भात दोन ट्विट केले आहेत.

 

नक्की काय म्हटलंय ट्विट मध्ये?

महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यात 4 acid attack च्या दुर्देवी घटना घडलेल्या आहेत! नागपुर मध्ये, हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्रोफेसर ‘…..’ (या ठिकाणी नावाचा उल्लेख आहे) ला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. असं म्हणत त्यांनी पीडितेच्या नावाचा उल्लेख केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पीडितेची ओळख सोशल मीडिया अथवा माध्यमांवर सांगता येत नाही. असे न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र, असं असताना देखील अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये पीडितेची ओळख सांगितली आहे. त्यामुळं सरकारवर टीका करताना अमृता फडणवीस यांनी पीडितेचा उल्लेख केला आहे.

तसंच या ट्विटमध्ये पुढं सरकारवर टीका करताना त्यांनी ‘औरंगाबाद मधील बलात्काराचे प्रकरण-ऐकून त्रास होतो! आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणं आवश्यक असल्याचं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसंच राज्यातील महिलांच्या सुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ ह्या ‘acid attack victims’ (acid attack Victims च्या ऐवजी acid attack victors असा ट्विटमध्ये उल्लेख आहे) साठी असलेल्या योजनेतील सवलती ‘…’ (या ठिकाणी पीडितेच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे) देण्यात याव्या अणि महिला आयोगाच्या अध्यक्षाचे पद लवकर भरण्यात याव्यात. अशी मागणी केली आहे.

पुढे आपल्या ट्विटमध्ये अमृता यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्न आता जमिनीवर येऊन पूर्ण कराट. असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मात्र, ही टीका करताना अमृता यांच्याकडून अनेक चुका झाल्या आहेत.

Similar News