किरीट सोमय्या यांनी घरीच थांबाव,अन्यथा महागात पडू शकतं- मिटकरी

Update: 2021-09-19 14:45 GMT

भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूरात प्रवेशबंदीची नोटीस आल्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान 'मला अटक करण्यासाठी माझ्या घरासमोर मोठा फौजफाटा आलेला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता' यावरून भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस निषेध व्यक्त केला आहे. सोबतच भाजप नेत्यांनी यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका करत सरकारवर गंभीर आरोप केले.

या सर्व आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच किरीट सोमय्या यांना कोणतीही इजा होऊ नये म्हणून ही नोटीस देण्यात आली आहे, सोमय्या यांनी घरीच थांबाव, अन्यथा महागात पडू शकतं असं मिटकरी यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. या आरोपांची सखोल माहिती घेण्यासाठी ते कोल्हापूरला जाणार होते. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापूर जिल्हाबंदीची नोटीस देण्यात आली आहे. सोमय्या यांनी याआधी विदर्भात वाशिममध्ये गेले होते. त्यांनी खासदार भावना गवळी यांच्या शाळेला भेट दिली होती. या भेटीनंतर तेथे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरला जाण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची एक नोटीस आली आहे. त्यावरून त्यांच्या सुरक्षेसाठीच हे सगळं करण्यात येत आहे. त्याचा सोमय्या यांनी राग मानू नये, असं मिटकरी यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News