महाराष्ट्रात कोरोना वाढ : धास्ती कर्नाटकात

Update: 2021-02-22 10:52 GMT

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आता कर्नाटक सरकारने दक्षता घेतली आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांसाठी टेस्ट असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. आज सकाळपासून याचे अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच कर्नाटकात इतर RTC-PCR बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर सीमेवर कोगनोळी टोल नाका येथे वाहनांची गर्दी झाली अनेक वाहने परत पाठवण्यात आली. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. मागील २४ तासांमध्ये राज्यात ६ हजार ९७१ करोनाबाधित वाढले असुन, ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

ही आकडेवारी राज्यभरातील नागरिकांबरोबरच सरकार व प्रशासनाची देखील चिंता वाढवणारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आज या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी , मास्क वापरा लॉकडाउन टाळा, शिस्त पाळा लॉकडाउन टाळा, असं आवाहन केल आहे. आठ दिवसात परीस्थिती पाहून राज्यात लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २१ लाख ८८४ वर पोहचली आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात २ हजार ४१७ जण करोनातून बरे झाले. तर, एकूण १९ लाख ९४ हजार ९४७ जणांनी करोनामुक्त झालेले आहेत. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या ५२ हजार ९५६ असुन, आजपर्यंत ५२ हजार ९५६ रुग्णांचा राज्यभरात करोनामुळे मृत्यू झालेला आहे.


Tags:    

Similar News