'बर्ड फ्ल्यू' अत्यंत धोकादायक, राज्यात हायअलर्ट घोषीत करणं गरजेचं : राजेश टोपे

बर्ड फ्ल्यू आजाराचा मृत्यूदर हा १० ते १२ टक्के इतका आहे. हा खूपच धोकादायक आहे. या आजाराचा संसर्ग सुरुवातीला पक्षांमध्ये होतो. या आजाराचा मानवी शरिरात देखील संसर्ग होतो. देशात व महाराष्ट्रात काही ठिकाणी बर्ड फ्लूचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट घोषीत करणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं.

Update: 2021-01-11 13:41 GMT

गेली वर्षभर कोरोना महामारीच्या संकटाला झगडणाऱ्या प्रशासन व्यवस्थेला आता बर्ड फ्लू या संकटाचा सामना करावा लागत आहे. करोनावर मात करण्यासाठी लवकरच लसीकरण सुरू होत असताना राज्यासमोर बर्ड फ्लूचे संकट उभं आले आहे.

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे 4 दिवसांपूर्वी 800 कोंबड्यांचा दोन दिवसांच्या दरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पशुरोग संस्थेने दिलेल्या अहवालानुसार मुंबई ठाणे परभणी बीड दापोली आणि रत्नागिरी मध्ये मृत पावलेल्या पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे.

बर्ड फ्लू'बाबत सर्वांनी खूप सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. त्यासाठी राज्यात हाय अलर्ट जारी करायला हवा. पशुसंवर्धन व आरोग्य विभागानं तातडीनं उपाययोजना सुरू करायला हव्यात असंही ते म्हणले.

Tags:    

Similar News