राजीनाम्याच्या १२ तासांनतरही अजित पवार नॉट रिचेबल

Update: 2019-09-28 04:32 GMT

आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या १२ तासांनंतरही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नॉट रिचेबल आहेत. खुद्द शरद पवार यांनीही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र, अजित पवार हे कुठे आहेत हे अद्याप कोणालाही माहिती नाहीय. राजीनामा दिल्यापासून त्यांचा फोनही स्वीच ऑफ आहे. त्यांचे स्वीय सहाय्यकांचे फोनही बंद आहेत.

अजित पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याच्या रेस्ट हाऊसवर आहेत अशा चर्चा काल काही काळ होत्या. मात्र, या वृत्ताला अद्याप कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पवार यांच्यासोबत त्यांचे काही जवळचे मित्र आहेत असं बोललं जातंय.

काल रात्री पार्थ पवार यांनीही ट्विट करत हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि भावनिक दिवस असल्याचं म्हटलंय. अजित पवार हे राज्य बँकेचे अध्यक्ष होते. या बँकेतील अनियमिततेमुळे शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला. यामुळे व्यथित होऊन त्यांनी राजीनामा दिल्याचं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं

Similar News