पुणे शहरातील शाळा-कॉलेजबाबत पालकमंत्र्यांचा मोठा निर्णय

Update: 2022-01-29 10:06 GMT

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यानुसारच काही ठिकाणी या शाळा-महाविद्यालय सुरु होत आहेत. ठाण्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी शाळा सुरु होत आहेत. आठवड्यातुन ४ दिवस ऑफलाईन आणि २ दिवस ऑनलाईन शाळा भरणार आहेत. याच पार्श्वभुमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील शाळा आणि महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

पुण्यात १ फेब्रुवारीपासुन शाळा महाविद्यालय सुरु होणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. नववीपासुनचे पुढचे वर्ग पुर्ण वेळ भरणार आहेत. पण पहिले ते आठवीपर्यंतचे वर्ग फक्त चार तास भरतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मुलांना शाळेत पाठवायच की नाही याचा निर्णय पालकांनी स्वत: घ्यायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यतील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचं अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काही राज्यांत मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली आहे. पण महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंबईत बऱ्यापैकी रुग्णसंख्या कमी झाली आहे. पुण्यातही दोन दिवसात रुग्णसंख्या कमी झाली आहे. ती अजून कमी व्हावी अशी अपेक्षा आहे, असं अजित पवारांनी सांगितलं

Tags:    

Similar News