माढा मतदार संघावर अजित पवार गटाचा दावा ; महायुतीत वादाची ठिणगी!

Update: 2024-03-04 04:52 GMT

महाराष्ट्रातील माढा मतदारसंघ हा राजकारणाच्या दृष्टीने कायमच चर्चेत राहिला आहे. दिर्घकाळ या मतदार संघावर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला राहिलेला होता. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत या मतदार संघात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे निवडून आले आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे राष्ट्रवादीचा बाले किल्ला असणारा माढा मतदार संघ भाजपकडे जाणार की राष्ट्रवादीकडे राहणार यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीकोणातू आता माढ्यातल्या जागेवरून शिंदे गट-भाजपा-अजित पवार गट या सत्ताधारी महायुतीत वादाची ठिणगी पडणार का? अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे. माढ्यातील विद्यमान खासदार भाजपाचे असून अजित पवार गटानं या जागेची मागणी केली आहे. शिवाय, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर खोचक टीकाही केली आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे माढाच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News