Ajit Pawar अजित पवारांनी मागितली माफी.

Update: 2023-01-07 11:46 GMT

मी असा काय तुझा गुन्हा केला? ज्यामुळे आकाश पातळ एक झालं. सावित्रीबाई फुले यांना चुकून सावित्रीबाई होळकर म्हणालो. बोलण्याच्या ओघात चूक झाली. अशी चूक व्हायला नको, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी माफी मागितली आहे.

 "पुणे येथील कार्यक्रमात भाषणावेळी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊं माँसाहेब' या महामानवांचं स्मरण करताना, कर्तृत्व सांगताना बोलण्याच्या ओघात माझ्याकडून 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' ऐवजी 'क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर' असा उल्लेख झाला. 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांचं कार्य आपल्या सर्वांना माहित आहे. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसात छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर की स्वराज्य रक्षक यावरून वाद निर्माण झाला आहे. भाजपने राज्यभर आंदोलन केल्यानंतर अजित पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते.  AjitPawar अजित पवारांनी मागितली माफी..आता चूक होतास तात्काळ त्यांनी माफी मागितल्याने या विषयावर वाद निर्माण होणार नाही अशी अपेक्षा आहे.

Tags:    

Similar News