अहमदनगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरण ; चार जणांना अटक

Update: 2021-11-09 13:28 GMT

अहमदनगर // जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी अहमदनगर तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात आज सायंकाळी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका यांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे, तर शेख आणि चन्ना आनंत यांचा सेवा समाप्ती करण्याचा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा आदेश आहे.

दरम्यान अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटनांनी परिचारिकांना या गुन्ह्यात अटक केल्याने निषेध नोंदवला असून ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे. यामधील प्रमुख सुत्रधाराला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आज, मंगळवारी तोफखाना पोलिस ठाण्यात याप्रकरणी तीन जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके करीत आहेत.

Tags:    

Similar News