'अग्निपथ'च्या देशव्यापी उद्रेकात संरक्षणमंत्र्यांची नवी ऑफर

Update: 2022-06-17 08:29 GMT

'अग्निपथ' (agnipath)योजनेवरून देशभर तरुणांचा उद्रेक सुरु असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी लष्करात भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी तरुणांना भरतीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.

सरकार आणि लष्कराच्या (indian army)घोषणेपासून बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडसह अनेक राज्यांमध्ये या योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने होत आहेत. मात्र, सरकारने वयोमर्यादेत दोन वर्षांची वाढ केली होती, पण धोरण मागे घेणार नाही असे जाहीर केले आहे. लष्कर भरतीचे जुनेच धोरण लागू करण्याची मागणी आंदोलकांकडून होत आहे.

संरक्षण मंत्री सिंह म्हणाले की, अग्निवीर (agniveer)योजनेमुळे तरुणांना मोठी संधी मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे (covid19) तरुणांना नोकरभरतीची संधी मिळाली नाही, त्यामुळेच पंतप्रधान मोदींच्या आदेशानुसार सरकारने दोन वर्षांच्या वयोमर्यादेत शिथिलता दिली आहे. ते म्हणाले, 'मला सांगायचे आहे की भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यासाठी सर्व तरुणांनी तयारी करून पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारने वयोमर्यादा वाढवली

केंद्र सरकारने सैन्यात नव्याने भरती होण्यासाठी वयोमर्यादा 17 ते 21 वर्षे ठेवली आहे. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, गेल्या दोन वर्षांत भरती न झाल्यामुळे, सरकारने 2022 मध्ये प्रस्तावित भरतीसाठी एकवेळ सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासह, 2022 सालासाठी अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीचे वय 23 वर्षे करण्यात आले आहे.



चार वर्षांच्या अल्प कालावधीसाठी लष्कराला पुन्हा करारावर सामावून घेण्याच्या केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेला हिंसक निदर्शने करत आज सलग तिसऱ्या दिवशी बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने भारतीय रेल्वेला लक्ष्य करून, तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. पोलीसांनी सांगितले की, अग्निपथ योजनेच्या विरोधात सैन्य भरतीचे उमेदवार शुक्रवारी सकाळपासून रस्ते आणि रेल्वे मार्गावर आंदोलन करत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि अनेक रेल्वे विभागांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.




उत्तर प्रदेशातील बलियामध्ये तरुणांच्या जमावाने गोंधळ घातला आणि अनेक गाड्यांची तोडफोड केली. सूत्रांनी सांगितले की, बलिया रेल्वे स्थानकावर धुण्यासाठी उभ्या असलेल्या एका ट्रेनला तरुणांनी आग लावली आणि त्यामुळे तिची एक बोगी जळू लागली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी जिल्हा मुख्यालयातील वीरलोरिक स्टेडियमवर तरुणांचा जमाव जमला होता. संरक्षणमंत्र्यांच्या आवाहनाला तरुणाई कसा प्रतिसाद देतेय आणि असंतोष क्षमणार का ?याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

Tags:    

Similar News