Agneepath Scheme: केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी जाहीर केलेली अग्नीपथ योजना काय आहे?

Update: 2022-06-14 12:03 GMT

केंद्र सरकारने आज सशस्त्र दलात जवानांच्या भरतीसाठी "अग्निपथ योजना" जाहीर केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसंदर्भात बोलताना सिंह यांनी हा सरकारचा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. यावेळी लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुखही उपस्थित होते.

काय आहे अग्निपथ योजना?

या योजनेंतर्गत 17.5 वर्षे ते 21 वर्षे वयोगटातील साधारण 45 हजार तरुणांना 4 वर्षांसाठी सैन्यात भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पुढील 90 दिवसांत सुरू केली जाईल आणि जुलै 2023 पर्यंत पहिली तुकडी तयार होईल. या योजनेंतर्गत सैन्यात निवड झालेल्या तरुणांना अग्निवीर म्हणून ओळखले जाईल. ही निवड ऑनलाइन केंद्रीय प्रणालीद्वारे केली जाईल.

४ वर्षाच्या कालावधीत ६ महिन्यांचे प्रशिक्षण असेल तरूणांना दिलं जाणार. 4 वर्षांनंतर त्यातील 25 टक्के जवान सशस्त्र दलात परत येऊ शकतील आणि ते पुन्हा 15 वर्षे सैन्यात सेवा करतील. उर्वरित जवान सेवेबाहेर राहतील. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारच्या पेन्शन सुविधेचा लाभ मिळणार नाही.

या कालावधीत अग्निवीरांना 30 हजार -40 हजार रुपये वेतन दिले जाईल. याशिवाय त्यांना भत्तेही दिले जातील. त्यांना वैद्यकीय आणि विमा सेवांचाही लाभ मिळणार आहे. अग्निवीरांच्या शैक्षणिक पात्रतेसाठी लष्करात भरती होण्यासाठी जो निकष असेल तोच निकष अग्निवीरांच्या भरतीसाठी असेल. अग्निपथ योजनेंतर्गत महिलांनाही सशस्त्र दलात सामील होण्याची संधी दिली जाणार आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे अग्निपथ योजनेचा उद्देश सैन्याला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आणि सक्षम बनवणे हा असल्याचं सांगितलं.

Tags:    

Similar News