राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर काँग्रेस नेते कमलनाथ काय म्हणाले..? वाचा सविस्तर

Update: 2024-02-19 09:20 GMT

काँग्रेस पक्षाचे जेष्ट नेते तथा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधान आल्यामूळे भोपाळपासून दिल्लीच्या राजकारणात एकच खळबळ उडाळी होती. दरम्यान काँग्रेस पक्ष सोडून भाजपात जाणार नसल्याचं कमलनाथ यांनी निश्चित केलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कमलनाथ यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू कमलनाथ यांचे सुपूत्र नकुलनाथ यांच्यासह अन्य काही काँग्रेस आमदार भाजपामध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी, माजी मुख्यमंत्री दिग्वीजय सिंह आणि मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी कमलनाथ यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा आधीच फेटाळून लावल्या आहेत. मध्यप्रदेशमधील माजी मंत्री सज्जन वर्मा यांनी नवी दिल्लीमध्ये १८ फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी चर्चा केली होती. कमलनाथ यांच्या निवासस्थानी ही चर्चा सुमारे अर्धा तास झाली होती. या भेटीनंतर सज्जन सिंह यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, कमलनाथ यांच्याशी काही मुद्यावर चर्चा झाली असून राहूल गांधी यांच्याशीही त्यांचं बोलणं झालं आहे.

सज्जन सिंह वर्मा म्हणाले की, कमलनाथ यांचं लक्ष सध्या मध्यप्रदेशातील लोकसभेच्या २९ जागांवर आहे. ते जातीय समीकरणं जुळवत असून कुणाला तिकीट द्यायचं आणि कुणाला नाही, याबाबत विचार करत आहेत. असंही सज्जन सिंह वर्मा यांनी यावेळी सांगितलं. 

Tags:    

Similar News