Opposition Meeting Bangalore : पाटणापाठोपाठ बंगळूरमधून रणशिंग, ‘त्या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

Update: 2023-07-17 03:38 GMT


पाटणा येथे देशभरातील 14 विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी सरकारविरोधात वज्रमूठ आवळली होती. त्यानंतर पुढील बैठक शिमला येथे होणार होती. मात्र शिमला येथील बैठक रद्द करून बंगळूर येथे घेण्याची चर्चा झाली. त्यामुळे 17 आणि 18 जूलै रोजी ही बैठक बंगळूरमध्ये होणार आहे.

मोदी सरकारविरोधात देशभरातील 14 विरोधी पक्षांनी एकत्र येत नितीश कुमार यांच्या पाटणा येथील निवासस्थानी बैठक घेतली होती. त्यात झालेल्या चर्चेनंतर पुढील चर्चेसाठी पुढची बैठक शिमला येथे घेण्यातच येणार होती. मात्र शिमला ऐवजी आता ही बैठक बंगळूर येथे होत आहे. या बैठकीच्या माध्यमातून लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीला देशभरातील 23 विरोधी आघाडीचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बंगळूर येथे होणाऱ्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी हे उपस्थिती राहणार आहे. या बैठकीत लोकसभेच्या जागा लढवण्यासंदर्भात मंथन होणार आहे. त्यानंतर किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काळात मोदी सरकारविरोधात लढण्यासाठीची रणनिती या बैठकीत ठरविली जाणार आहे. या बैठकीनंतर मंगळवारी विरोधी पक्षांची संयुक्त बैठक होणार आहे.

रुसवे फुगवे दूर करण्यासाठी बैठक महत्वाची ठरणार

केंद्र सरकारच्या दिल्ली संदर्भातील वटहुकूमाविरोधात काँग्रेसने भूमिका जाहीर न केल्याने आपचे संयोजक अरविंद केजरीवाल हे बैठकीतून निघून गेले होते. तो रुसवा फुगवा या बैठकीतून कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचा आमदार फोडल्याने निर्माण झालेला रुसवा कमी करण्यासाठी या बैठकीमध्ये प्रयत्न केले जातील.

बैठकीचा अजेंडा काय?

विरोधी पक्षाच्या बैठकीत किमान समान कार्यक्रम राबवण्यासाठी मसुदा तयार करण्यासाठी उपसमितीची स्थापना केली जाणार

लोकसभेसाठी विरोधकांची आघाडी असताना कोणत्या मुद्द्यावर संवाद करायचा याची निश्चिती करणे

संयुक्त कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी उपसमितीची स्थापना करणे. त्याबरोबरच सभा, संमेलनं, आंदोलनं आणि अधिवेशन याच्या रणनितीचा यामध्ये समावेश असेल.

लोकसभेसाठी जागावाटप कशी करायची? याविषयी चर्चा होणार

EVM वर चर्चा करून निवडणूक आयोगाला सुधारणा सुचविण्यात येणार आहे.

Tags:    

Similar News