केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, भाजप मनसे युती होणार?

Update: 2022-04-09 14:35 GMT

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र त्यानंतर राज्यात भाजप मनसे युतीच्या चर्चेला उधाण आले होते. तर आता अचानक केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्य भुवया उंचावल्या आहेत. (Nitin Gadkari Meet to raj Thackeray)

राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. त्यानंतर मनसे भाजपच्या वळचणीला जाणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. तर गुढीपाडवा मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजप नेते नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यात भाजप मनसे समीकरणाची चर्चा सुरू झाली होती. (will BJP-MNS alliance in Maharashtra )

त्यापाठोपाठ आता भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे नितीन गडकरी यांच्यापाठोपाठ रावसाहेब दानवे यांनी घेतलेल्या भेटीमुळे भाजप मनसे जवळ येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नितीन गडकरी यांनी राज ठाकरे (Nitin gadkari-Raj Thackeray Meeting) यांची राजकीय भेट नसल्याचे म्हटले होते. तर ही भेट कौटूंबिक आहे. तसेच राज ठाकरे यांचे नवे घर शिवतीर्थ पहायला आलो असल्याचे नितीन गडकरी म्हणाले होते. मात्र आता नितीन गडकरी यांच्यानंतर रावसाहेब दानवे हेसुध्दा राज ठाकरेंचे घर पहायला आले का? अशी चर्चा आहे.

रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर रेल्वेच्या जागेवर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत चर्चा केल्याचे म्हटले आहे. मात्र या भेटीदरम्यान भाजपचे माध्यमप्रमुख विश्वास पाठक, शायना एनसी यासुध्दा उपस्थित होत्या. त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर नितीन गडकरी यांच्यापाठोपाठ रावसाहेब दानवे यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात भाजप मनसे युती होणार का? याबाबत चर्चा सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे संकेत (Devendra fadanvis)

देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर सांगितले की, राजकारणात अनेक गोष्टी घडत असतात. त्या प्रत्येक घटनेचा अन्वयार्थ त्या त्या वेळी लावायचा असतो. त्यामुळे आपण वाट बघायला हवी. तसेच राज ठाकरे यांच्यासोबत आमचे अनेक वर्षांचे संबंध आहेत. त्यामुळे त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. आम्ही यापुढेही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊ. परंतू नितीन गडकरी यांनी घेतलेली भेट, त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी घेतलेली भेट आणि दरम्यान देवेंद्र फ़डणवीस यांनी केलेले वक्तव्य यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूकीत (BMC election) भाजप मनसे एकत्र येण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.

Tags:    

Similar News