जालना : मुंबई,पुण्यासह आता जालन्यात ही मोठ्या प्रमाणात नशिल्या पदार्थांचे सेवन करणारे नशेखोरी वाढताना दिसून येत आहेत. दरम्यान जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी या ड्रग्स माफीयांनाच पाठीशी घालत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या आठवड्यात जालन्यातील बसस्थानक परिसरातुन एका रिक्षा चालकाला भोकरदन नाका पोलीस चौकीच्या बाजुला बोलावुन बेदम मारहाण करत त्याच्या शरीरात जबरदस्तीचे नशेचे द्रव्य असलेले इंजेक्शन दिल जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात मोहसिन उर्फ भाई खान, मुकर्रम लाला, शोहेब काजी, सोहेल उर्फ झमेला आणि एका महीलेवर गुन्हा दाखल झालाय.
महिला या टोळक्यांना सोबत घेत तरुणांना जबरदस्तीने ईंजेक्शन टोचल्याचा व्हिडीओ समोर येतोय. विशेष म्हणजे दुसर्या अन्य एका व्हिडीओत तीच महीला रिक्षात बसलेल्या दुसर्या तरुणांच्या छाताडावर पाय ठेवुन त्याला ही जबरदस्तीने नशेचे ईंजेक्शन टोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे, हा तरुण त्या महीला आणि तिच्या सहकाऱ्याकडे पुर्ण संपत्ती नावावर करुन देतो पण मला ईंजेक्शन देवु नका अशी विनवणी करतांना दिसत आहे परंतु त्या टोळक्याला दया येत नसल्याचे या व्हिडीओ च्या माध्यमातून दिसून येत आहे.
मजहर खान यांना झालेल्या मारहाण व जबरदस्ती दिलेल्या इंजेक्शन संदर्भात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांनी केलाय यात दोन ईंजेक्शन जप्त केल्या गेलीत परंतु जालन्यात चालत असलेल्या या ड्रग माफियांमुळे जालन्यात दहशत निर्माण झालीय.