लॉकडाऊनचे परिणाम - रेशन हक्कांसाठी आदिवासींचे ठिय्या आंदोलन

Update: 2020-05-29 04:25 GMT

रेशन हक्क आणि आदिवासींच्या हक्कांसाठी सुरू श्रमजीवी संघटनेने गेल्या चार दिवसांपासून "हक्काग्रह" आंदोलन सुरू केले आहे. ठाणे,पालघर,रायगड,आणि नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तहसिल कार्यालयासमोर दररोज आंदोलक ठिय्या देऊन आंदोलन करत आहेत. पण या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून आंदोलन केले जात आहे. पण वसई आणि पालघरमध्ये आंदोलनकांवर गुन्हे दाखल करम्यात आले आहे.

रेशनकार्डची रखडलेल्या प्रकरणांची आकडेवारी, सरकारकडून अधिकाऱ्यांना कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्याचे चित्र पाहता आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारने हायकोर्टापुढे सादर केलेल्या हमीपत्राची अंमलबजावणी व्हावी आणि गरीबांना रेशन धान्यासोबत इतर जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात अशी या आंदोलकांची मागणी आहे.

डहाणू तालुक्यात संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर विवेक पंडित यांनी डहाणू तहसिल कार्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पुन्हा आंदोलनाच्या जागेवर आणून पोहचवले.

Similar News