चित्रपटगृह आणि नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरू करा, प्राजक्ता माळीचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

Update: 2022-02-13 06:56 GMT

प्रसिध्द मराठी अभिनेत्री आणि निवेदिका प्राजक्ता माळी तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. तर सध्या प्राजक्ता माळीने शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना केलेल्या आवाहनामुळे प्राजक्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

प्राजक्ता माळी आपल्या निवेदनासोबत अभिनयामुळे आणि सौंदर्य़ामुळे कायम चर्चेत असते. तर नुकतेच प्राजक्ताने आपले प्राजक्तप्रभा हे पुस्तक सुद्धा प्रकाशित केले आहे. त्यातच प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर आवाहन केले आहे.

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे. पण आता बोलायला हवे. सर्व मराठी रसिक सुज्ञ आहेत, करोना नियमांचं पालन करून ते कलाकृतींचा आस्वाद घेतील अशी आम्हांला खात्री वाटते. तरी आमची विनंती विचारात घ्यावी. सर्वच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. १८ फेब्रुवारीला पावनखिंड चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याही चित्रपटावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतील. प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. पण आता सरकारलाच विनंती आहे की, कोरोनाचा जोर ओसरला आहे. सर्वच नियम बऱ्यापैकी शिथील करण्यात आले आहेत. फक्त चित्रपटगृह आणि नाट्यगृहच ५० टक्के आसनक्षमतेने सुरु आहेत, असे का? असा प्रश्न व्हिडीओतून विचारला आहे.

तर पुढे प्राजक्ता माळीने लिहीले आहे की, आम्हा सर्वांची अशी नम्र विनंती आहे की शिवजयंती तोंडावर आहे. त्या निमित्ताने सर्व शिवप्रेमींना, चित्रपट निर्मात्यांना, सर्व रंगकर्मींना १०० टक्के आसनक्षमतेने सर्व चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु झाली आहेत, ही आनंदाची बातमी द्याल. आम्ही आशा करतोय की १०० टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु व्हावीत. त्याचा आम्हा सर्व कलाकारांना आणि चित्रपट निर्मात्यांना खरच खूप फायदा होईल. ही सरकारला नम्र विनंती. त्यासोबत प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहा, ही विनंती. असे प्राजक्ता माळीने या व्हिडीओत म्हटले आहे.

Full View
Tags:    

Similar News