'मुलगी झाली हो' या मालिकेपासून ते मराठी बिग बाँस चा एक मोठा प्रवास करणारे अनेक चित्रपटात काम करणारे आणि सोबतच स्वताला फुले,शाहू,आंबेडकरवादी असल्याच ठनकाउन सांगणारे अभिनेते किरण माने उद्धव ठाकरे यांच्या शिव बंधनात आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत किरण माने यांचा पक्ष प्रवेश होईल... भारतीय जनता पक्षावर फेसबुकच्या माध्यमातून टीका केल्याने किरण माने यांना राजकीय दबावातून वाहिनीनं मालिकेतून काढलं असा थेट आरोप माने यांनी वाहिनीवर केला होता. सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून किरण माने थेट ठाकरे गटाचं शिवबंधन बांधणार आहेत ...
मातोश्रीवर पक्ष प्रवेश
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी आज मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहे. बीडमधील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे ठाकरे गटात प्रवेश होणार आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर उपविभाग अध्यक्ष निलेश जंगम यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत काही मनसेचे महत्वाच्या पदावर असलेले नेते पादाधिकारी देखील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील आस चित्र आहे. तसेच मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते किरण मानेदेखील आज मातोश्रीवर पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सिनेकलावंत किरण मानेंचा प्रवास
'मुलगी झाली हो' या मालिकेपासून ते मराठी बिग बाँस चा एक मोठा प्रवास करणारे अनेक चित्रपटात काम करणारे आणि सोबतच स्वताला फुले,शाहू,आंबेडकरवादी असल्याच ठनकाउन सांगणारे अभिनेते किरण माने आज उद्धव ठाकरे यांच्या शिव बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
आपल्याला तुकाराम महाराज आणि तत्सम पुरोगामी संताच वारसा असल्याचा सांगतात. किरण माने सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय भूमिका मांडत असतात. त्यांच्या या वादग्रस्त पोस्टमुळे अनेकदा ते ट्रोल होतात. 'सातारचा बच्चन' अशी किरण माने यांची ओळख आहे. सोशल मीडियावरुन टीका टिपणी करणारे किरण माने सध्या 'सिंधुताई माझी माई' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यावर आधारित ही मालिका आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत किरण माने यांची महत्त्वाची भूमिका साकारली होती.
किरण माने 'मुलगी झाली हो' या मालिकेत विलास पाटील हे पात्र साकारत होते. अभिनयासह ते सोशल मीडियाच्या माध्यमातून बेधडकपणे भाष्य करत असतात. 'मुलगी झाली हो' दरम्यान त्यांनी केलेली राजकीय पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यावेळी राजकीय दबावातून वाहिनीनं मालिकेतून काढलं, या पोस्टमुळे ट्रोल करण्यात आलं त्यानंतरच मालिकेतून काढलं असल्याचा आरोप किरण माने यांनी केला होता.