अखेर प्रज्ञा ठाकूर यांची संसदेच्या संरक्षण समितीवरुन हकालपट्टी

Update: 2019-11-28 06:36 GMT

महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे ला देशभक्त म्हणणाऱ्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना संसदेच्या संरक्षण समितीच्या सल्लागार समिती वरुन काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी ही माहिती दिली आहे.

प्रज्ञा यांचं संसदेत केलेलं विधान निंदनीय होतं. भाजप कधीही अशा विचारधारांचं अथवा या विधानाचं समर्थन करत नाही असं म्हणत..

‘आम्ही प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण समितीच्या सल्लागार समितीतून काढण्याचा निर्णय़ घेतला आहे. संसदेचं सत्र सुरु असताना संसदीय दलाच्या बैठकीत भाग घेण्याची परवानगी देखील त्यांना नसेल’

 

२७ तारखेला एसपीजी सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु होती. तेव्हा द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी गोडसेच्या एका विधानाचा हवाला दिला. त्याने (गोडसेने) महात्मा गांधींना का मारले?

हे ही वाचा...

कुणी घर देतं का घर? आदिम आदिवासी जमातीचा टाहो

फोटोग्राफर, शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री…

उद्धव ठाकरेंसोबत उद्या ६ मंत्र्यांचा शपथविधी; विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे

“गोडसेने स्वतः हे कबूल केले होते की, ३२ वर्षांपासून त्याने महात्मा गांधीविरोधात आपल्या मनात द्वेष बाळगला होता. त्यानंतर शेवटी त्याने गांधीजींची हत्या करण्याचा निर्णय घेतला. गोडसेने गांधींची हत्या यासाठी केली की तो एका विशिष्ट विचारधारेचा होता.”

त्यानंतर संसदेत उपस्थित असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी राजा यांना मध्येच थांबवत म्हटले की... ‘आपण इथे एका देशभक्ताचे उदाहरण देऊ शकत नाही’ ठाकूर यांच्या या विधानानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर कॉंग्रेसने मोदींवर जोरदार निशाणा साधला होता.

Similar News