लोकांना बोलण्यात गुंतवून हात चलाखीने दागिने लुटणाऱ्या आरोपीला केली अटक

Update: 2021-10-05 01:54 GMT

तुम्ही एका महिलेला हात लावला, गर्भवती महिलेला कट मारला, खात्री करतोय की ती व्यक्ती तुम्ही आहात की नाही, अशी अनेक कारणे सांगून,अंगावर असणारे सोने,मोठ्या शिताफीने काढून पळ काढणारा चोरटा नवी मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. रमनिकलाल शहा नावाचा हा आरोपी आपल्या संभाषण कौशल्याने लोकांना भुरळ पाडून लोकांना लुटत असे. या सराईत गुन्हेगाराला नवी मुंबई पोलिसांनी नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्टेशनच्या बाहेरून सापळा रचून घेतले ताब्यात.

विशेष म्हणजे त्याच्याकडून लुटलेला 2 लाख 68 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपीवर याआधी एकूण 26 गुन्हे दाखल असून त्यातील 5 गुन्हे उघडकीस आले आहेत,तर अशा प्रकारच्या शंभर गुन्ह्यात त्याचा हात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली आहे. आरोपी मूळचा घाटकोपरचा रहिवाशी असून आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे,पुढील तपास पोलिसानंकडून सुरू आहे अशी माहिती पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News