लॉकडाऊनमध्ये लग्न? या नियमांचे पालन बंधनकारक

Update: 2020-06-09 03:01 GMT

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने घातलेले निर्बंध आता शिथिल करण्यात आले आहेत. पण लग्नसारख्या। समारंभांवर काही बंधनं घालण्यात आली आहेत.

लग्न समारंभासाठी अटी

१. 50 व्यक्तींना नियम व अटींच्या अधीन राहून लग्नसमारंभासाठी मुभा

२. लग्न समारंभाच्या ठिकाणी मंगल कार्यालयात कर्मचारी व लग्नासाठी उपस्थित सर्व व्यक्तींची संख्या ही 50 पेक्षा जास्त असणार नाही.

३. कोणताही आजारी व्यक्ती लग्न समारंभाला येणार नाही

४. यासह इतर शर्तीचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालयाचे परवाने रद्द करुन कारवाई करण्यात येईल.

लग्न समारंभासाठी लोकांची गैरसोय व कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निश्चित केलेले नियम व अटीचे उल्लंघन होणार नाहीत याची दक्षता घेऊन नांदेड जिल्ह्यातील मंगल कार्यालयांना मुभा देण्यात आली आहे.

या नियमचेपा पालन न करणाऱ्यांवर साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला आहे.

Similar News