लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन, आतापर्यंत हजारो लोकांना अटक

Update: 2020-06-09 01:17 GMT

राज्यात लॉकडाऊनच्या २२ मार्च ते ७ जून या कालावधीत कलम १८८ नुसार लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख २३ हजार ६३७ गुन्हे नोंदवले गेले आहेत. तर २३ हजार ८९३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ७८ लाख ०९ हजार ८९१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २६२ घटना घडल्या आहेत. त्यात ८४५ व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेल्या आहे.

लॉकडाऊनच्या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार ३३२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर ८० हजार ५३२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

Similar News