अभ्युदय बँकेच्या आगीतून संशयाचा धूर ?

Update: 2023-11-14 02:36 GMT

अभ्युद्य बँकेच्या कुर्ला-नेहरूनगर इथल्या मुख्यालयाला आग लागल्यानंतर मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे हे वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. ही आग इतकी भयंकर होती की, त्याचा परिणाम बँकेच्या इतर १११ शाखांवर झाल्याची शक्यता वर्तवली जातेय. या बँकेत सामान्य गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतलेले आहेत.

 सामान्य ग्राहकांच्या हितासाठी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अशावेळी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर स्वतः येऊन माहिती देणं अपेक्षित असतं. मात्र, इथं उलटच घडत होतं. बेँकेचे वरिष्ठ अधिकारी हेच माध्यमांपासून दूर पळत होते. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर येऊन माहिती देऊन सामान्य गुंतवणूकदार ग्राहकांना दिलासा देणं अपेक्षित होतं. यासाठीच मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बँक खासगी मालमत्ता असल्याचं बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितलं. यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कोलापटे यांच्याशी हुज्जतही घातली. सर्वसामान्य नागरिकांचे पैसे ज्या बँकेत गुंतलेले आहेत, ती बँक खासगी कशी होऊ शकते, त्यामुळं आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, असा प्रश्न बँकेच्या प्रशासनाला विचारला असता त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी अरेरावीची भाषा केली.  

 आगीच्या निमित्ताने मॅक्स महाराष्ट्रचे प्रश्न

१ ) सुरक्षेचे सर्व नियम पाळले असतील तर बॅंकेला आग कशी लागली ?




 


२) नियमानुसार १० वाजेपर्यंत फटाके फोडण्यासाठी न्यायालयाची परवानगी असते. हा नियम का पाळला गेला का ?


 



3) बँकेत लागलेल्या आगीत काय नुकसान झालं ? माध्यमांना वार्तांकनास मनाई का ?





४) अभ्युदय बँकेत सर्वसामान्य नागरिकांची गुंतवणूक असल्यानं बँक ही खासगी मालमत्ता कशी ? माध्यमांना माहिती देण्यास बँकेची टाळाटाळ का ?




 दरम्यान सर्वसामान्यांचा आवाज मानला जाणारा आणि देशाचा ४ चौथा स्तंभ असलेल्या माध्यम प्रतिनिधींसोबत अरेरावीची भाषा करन जनतेच्या प्रश्ना उत्तर न देणं यातून अभ्युदय बँकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

Full View


Tags:    

Similar News