भारतीय वायुसेनेने अभिनंदन वर्धमान यांना ग्रुप कॅप्टनचा दर्जा दिला

Update: 2021-11-03 15:46 GMT

मुंबई :  भारतीय वायुसेनेने बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो अभिनंदन वर्धमान (Abhinandan Vardhaman) यांना (IAF) बढती दिली आहे. भारतीय वायुसेनेने अभिनंदन वर्धमान यांना ग्रुप कॅप्टन (Group Captain) पदावर पदोन्नती दिली आहे. आतापर्यंत ते विंग कमांडर पदावर कार्यरत होते.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानी फायटर प्लेनने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे F-16 विमान पाडले. यात त्यांचे विमान पीओके मध्ये पडले होते. पाकिस्तानी सैन्याने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना कैद केले होते. मात्र, अभिनंदन पाकिस्तानच्या कैदीतून भारतात परतले.

पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडल्याबद्दल अभिनंदन यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. भारतीय हवाई दलाने त्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. लवकरच ते अधिकृतपणे ही रँक लिहिण्यास सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Tags:    

Similar News