आप लढणार नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक

Update: 2019-12-16 13:48 GMT

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक २० एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी १११ जागांवर निवडणूक लढणार आहे. आज आम आदमी पार्टीने पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढण्याची घोषणा केली. "निवडणूक जिंकल्यानंतर विकासाचं दिल्ली मॉडेल राबवण्याचं आश्वासन आम आदमी पार्टीनं केलं आहे."

आम आदमी पार्टीची लोकांशी बांधीलकी आहे. ज्याप्रमाणे दिल्ली मध्ये विकासाचं मॉडेल राबवण्यात आलं. स्वस्त शिक्षण, सगळ्यांसाठी शुद्ध पाणी , कमी वीज बिल, महिलांसाठी मोफत प्रवास अशाच प्रकारचं मॉडेल आम्ही मुंबईसाठी राबवणार असं मत आम आदमी पार्टीच्या कार्यकारी अध्यक्षा प्रिती मेनन यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलं.

नवी मुंबई प्रथम दर्जाचं शहर असून आता तीच रूपांतर निकृष्ठ दर्जाचं झालं आहे . भ्रष्टाचार आणि विविध प्रकारच्या समस्या या स्थितीला कारणीभूत आहेत.

राज्याचे आम आदमी पार्टीचे कार्यकारी सचिव आणि प्रवक्ते धनंजय शिंदे म्हणाले की, "आम्ही नवी मुंबईच्या आगामी निवडणूकींसाठी सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करणार आहोत." जवळ जवळ १११ जागांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत. मुंबई मध्ये खालावलेला आरोग्याचा दर्जा, भ्रष्टाचार हे आमचे मुद्दे असणार आहेत. त्याचप्रमाणे जनकल्याणकारी योजना राबवणार असल्याचं मत माध्यमांशी बोलताना धंनजय शिंदे यांनी व्यक्त केलं.

Similar News