माढा मतदारसंघासाठी शरद पवारांना युवकाने लिहले चक्क स्वतःच्या रक्ताने पत्र

अभयसिंह जगताप यांना उमेदवारी मिळावी म्हणून म्हसवड येथील युवकाचे शरद पवारांना स्वतःच्या रक्ताने पत्र

Update: 2024-03-10 11:12 GMT

जसं जशा निवडणुका जवळ येतील तस तशी प्रत्येक मतदारसंघात रंगत वाढू लागली आहे. अशातच आता माढा लोकसभा मतदारसंघात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील म्हसवड येथील एका युवकाने येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीसाठी थेट शरद पवार यांना आपल्या रक्तानेच पत्र लिहिले आहे.


म्हसवड येथील मनोज जगताप या युवकानी आपल्या माढा मतदारसंघातील उमेदवारासाठी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी असे लिहले आहे की, "पहिल्यापासून आपल्या राजकीय विचारांचा पाईक आहे आणि माढा मतदारसंघ हा आपल्या विचारांना मानणारा आहे तरी अभय जगताप यांनी केलेल्या भरीव कामाची पोहोच म्हणून त्यांना तिकीट देऊन माढा मतदारसंघात राष्ट्रवादीला पुन्हा उभारी देण्यास पाठबळ द्यावे ही विनंती" तरी युवकांच्या मतांचा आणि आपल्या सोबत राहिलेल्या निष्ठावंतांचा आपण तिकीट देऊन सन्मान कराल अशी अपेक्षा आहे." अभय जगताप यांना उमेदवारी यासाठी मनोज यांनी हे पत्र स्वत:च्या रक्ताने शरद पवार यांना लिहीले आहे. त्यामुळए कार्यकर्त्याच्या प्रेमापोटी शरद पवार माढाची जागा अभय जगताप यांना देतील देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अशा पद्धतीचंप

Tags:    

Similar News