'या'किल्ल्यावर सर्रासपणे सुरू होता गावठी दारूचा अड्डा

धुळे शहाराजवळील असलेल्या ऐतिहासिक लळिंग किल्ल्यावर सर्रासपणे गावठी हातभट्टी बनवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Update: 2021-08-09 12:11 GMT

धुळे :  धुळे शहाराजवळील असलेल्या ऐतिहासिक लळिंग किल्ल्यावर सर्रासपणे गावठी हातभट्टी बनवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला होता.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच मोहाडी पोलीसांनी सदरील ठिकाणी छापा टाकून कारवाई केल्याची माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. दरम्यान ही दारूची भट्टी कोणाचा होती याचा तपास मोहाडी पोलिसांनी सुरू केला आहे.

एकीकडे गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत असतांना, दुसरीकडे मात्र गड-किल्ल्यांवर असा प्रकारे अवैध व्यवसाय सर्रासपणे सुरू असल्याने पुरातत्व विभाग, वनविभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान संबधित दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे.

Tags:    

Similar News