गोवेरी गावात पाण्याच्या टाकीत आढळला दुर्मिळ काळ्या रंगाचा बिबट्या

Update: 2021-11-11 15:24 GMT

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मधील गोवेरी गावात पाण्याच्या टाकीत दुर्मिळ काळ्या रंगाचा बिबट्याचा (ब्लॅक पॅंथर) आढळला आहे. कुडाळमधील गोवेरी गावातील एका बागेमधील पाणाच्या टाकीत दोन दिवसांपासून काळ्या बिबट्याचे पिल्लू पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या बिबट्याला टाकीबाहेर काढले. दुर्मिळ काळ्या बिबट्याचे हे पिल्लू नर असून ते साधारण एक ते सव्वा वर्षाचे आहे.

बिबटा हा नर जातीचा असून अंदाजे 1.5 ते 2 वर्षे वयाचा आहे. पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करणेत आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शिंदे म्हणाले की, काळा बिबट अत्यंत दुर्मिळ बिबट प्रजात असून जनुकीय बदलांमुळे त्याचा रंग काळा होत असतो. बिबट हा निशाचर असून बहुतांशी भक्ष्याच्या शोधात तो रात्री बाहेर पडतो. बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आढळणारे प्राणी जसे बेडूक, उंदीर, घुशी, ससे, साळींदर, घोरपड, पक्षी, माकडे यांपासून ते लहान आकाराची हरणे यांवरती ते उपजीविका करतात. बिबट हा अन्नसाखळीच्या सर्वोच्च स्थानी असून परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक आहे. काळा बिबट हा अत्यंत दुर्मिळ बिबट असून त्याचे निसर्गातील वास्तव्य हे जिल्ह्यातील जंगलाचे परिपुर्णतेचे सकारात्मक प्रतिक आहे.

कोणताही वन्यप्राणी जखमी अथवा अडकलेल्या स्थितीत आढळून आल्यास तात्काळ वनविभागास माहिती द्यावी अस आवाहनही करण्यात आले.

Tags:    

Similar News