...आधी बोगस जनहीत याचिका थांबवा: सुप्रिम कोर्टाची वकिलांनी तंबी

Update: 2021-09-14 09:04 GMT

`तुम्ही काळा कोट घातला म्हणुन जनहित याचिके (Public interest litigation)च्या नावावर प्रसिध्दीहिताच्या (Publicity interest litigation)याचिका दाखल करता. फक्त वकील म्हणुन तुमचेच आयुष्य मौल्यवान नाही. आता बोगस जनहित याचिका बंद करण्याची वेळ आलीय,`` अशा शब्दात सर्वाच्च न्यायालयाने वकिलांना सुनावले आहे.

६० वर्षापेक्षा कमी वय असलेल्या वकिलांचा कोविडमुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना ५० लाख रुपये मदत करावी अशी मागणी करणारी याचिका वकिल प्रदिप कुमार यादव सुनावणीसाठी आली होती.

सर्वाच्च न्यायालयाचे खंडपीठ डी.वाय. चंद्रचुड, विक्रम नाथ, बी.वी. नागरथाना यांनी याचिका फेटाळून लावत, याचिकेतील एका मागणीला सबळ कारण नाही. फक्त कॉपी पेस्ट याचिका केल्या तर कोर्टानं त्या वाचाव्यात कशा? असाही सवाल न्यायमुर्तींनी याचिकाकर्त्याला केला.

कोविडमुळे देशात असंख्य लोक मृत्युमुखी पडले असताना तुम्ही वकिल आहात म्हणुन फक्त तुमच्यासाठी अपवाद का करावा ? अशा शब्दात सुर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला सुनावले.

Similar News