काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्रास वीरमरण

Update: 2020-04-19 01:40 GMT

काश्मिरमधील बारामुल्ला जिल्हयातील सोपोर इथे दहशतवाद्यांशी लढतांना बुलडाणा जिह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावातील चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय ३८) हा जवान शनिवारी शहीद झाला आहे. सोपोर भागात सीआरपीएफ आणि पोलिसांची तुकडी गस्तीवर असतांना दहशतवाद्यांनी हल्ला चढवला.

चकमकीत एकूण ३ जवान शहिद झाले असून दोघे जखमी झाले आहेत. शहिद झालेल्या जवानांमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय ३८) यांच्यासह बिहारचे राजीव शर्मा आणि परमार सत्यपाल सिंग या गुजरातमधील जवानाचा समावेश आहे. संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या पथकावर हल्ला चढवला. चंद्रकांत भाकरे हे १५ वर्षांपासून सीआरपीएफमध्ये तैनात होते. ते शेतकरी कुटुबातील असून त्यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.

Similar News