जमावबंदीच्या उल्लंघनामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल
जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिरूर आमळनेर पोलीस ठाण्यातून ही कारवाई करण्यात आली आहे.
सगे-सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमळनेरमधून हा गुन्हा दाखल झाला असून मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विनापरवाना रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलीसांकडून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमरण उपोषण मागे; पण साखळी उपोषण सूरूच -
फेब्रुवारीच्या १० तारखेपासून सूरू असलेलं उपोषण जरांगे पाटील यांनी आज मागे घेतले आहे. त्याचबरोबर इथून पुढे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझा जीव घ्या, पण सगेसोयरे ची अंमलबजावणी करूनच घेणार या आपल्या भूमिकेवर तटस्थ असलेल्या मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे. दोन दिवसांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असून आंतरवालीत साखळी उपोषण सूरूच राहणार आहे असे जरांगे यांनी स्पष्ट केलं.