समुद्र किनारी आढळलेल्या बोटीचं गूढ उलगडलं, पोलिसांना हायअलर्ट

Update: 2022-08-18 11:24 GMT

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर समुद्र किनारी एक संशयित बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. या बोटीमध्ये काही एके-४७ रायफल आणि इतर शस्त्र आढळल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली आहे.

बोटीत काय सापडले?

त्यानुसार हरिहरेश्वर किनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळून आली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने माहिती. त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आल्यानंचतर त्या बोटीमध्ये तीन ए.के. रायफल्स आणि रायफल दारुगोळा तसेच बोटींशी संबंधित कागदपत्रे आढळून आली आहे. ही बोट सापडल्यानंतर तातडीने किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हायअलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.



बोटीला अपघात कसा झाला?

याबाबत तात्काळ भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांनाही माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार त्या बोटीचे नाव "लेडीहान" असून या बोटीची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉर्डरगन या महिलेची आहे. तिचा पती जेम्स हॉबर्ट हा या बोटीचा कॅप्टन असून ही बोट मस्कतहुन युरोपकडे जाणार होती. पण २६ जून रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी हाक दिली. त्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एका कोरिअन युद्ध नौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्त केले. पण समुद्र खवळलेला असल्याने "लेडीहान" या बोटीचे टोईंग करता आले नाही, समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनान्यावर लागलेली आहे अशी माहिती भारतीय कोस्ट गार्डकडून मिळाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी सभागृहात दिली.

पण या घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक यांनी सुरू केला आहे. तसेच्या राज्यात आता सणवारांची सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत,तसेच भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय संस्थांशी सतत संपर्क टेवून बारकाईने पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

Full View

Similar News