8 यूट्यूब चॅनेल्सवर बंदी, केंद्र सरकारची मोठी कारवाई

Update: 2022-08-18 08:38 GMT

सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने देश विदेशातील युट्यूब चॅनलवर मोठी कारवाई केली आहे. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने 7 भारतीय आणि एका पाकिस्तानी यू ट्यूब चॅनल ब्लॉक केलं आहे. हे युट्यूब चॅनल 114 कोटी लोकांनी पाहिले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने IT नियम, 2021 अंतर्गत ही कारवाई केली आहे. केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.



यापैकी काही YouTube चॅनेलद्वारे प्रकाशित केलेल्या माहितीचा उद्देश भारतात धार्मिक द्वेष निर्माण करणे हा असल्याचं सूचना व प्रसारण मंत्रालयाने म्हटलं आहे. ब्लॉक करण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेलमधील विविध व्हिडिओंमध्ये खोटे दावे करण्यात आले होते.



या युट्यूब चॅनेलने बनावट बातम्या प्रसारीत केल्याचा दावा सरकारने केला आहे.

यूट्यूब चॅनेलचा वापर भारतीय सशस्त्र सेना, जम्मू आणि काश्मीर मधील विविध विषयांवर बनावट बातम्या पोस्ट करण्यासाठी करण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि दुसऱ्या देशाशी असलेल्या संबंधाच्या दृष्टीकोनातून ही माहिती चुकीची होती. म्हणून या चॅनलवर कारवाई करण्यात आली आहे.

Similar News