अमेरिकेत 4 कोटी नागरिक बेरोजगार, तर उद्योगपतींच्या उत्पन्नात अब्जो रुपयांची वाढ

Update: 2020-08-02 02:42 GMT

अमेरिकेत आर्थिक संकटाच्या काळातही अनेक बड्या उद्योगपतींचे उत्पन्न कोट्यवधी डॉलर्सने वाढलेले आहे, असे वृत्त बिझनेस इनसायडरने दिली आहे. या वृत्ताची दखल घेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, “ ही माहिती खरी आहे आणि अमेरिकेतील या आर्थिक विषमतेवर लवकरच उपाययोजना केल्या जातील” असे जाहीर केले आहे.

बिझनेस इनसायडर या दिलेल्या या वृत्तानुसार अमेरिकेत लॉकडाऊनमुळे सुमारे कोटी लोकांनी आपण बेरोजगार असल्याची नोंदणी केली आहे. पण त्याच काळात अमेरिकेती बड्या उद्येगपतींचे उत्पन्न 637 बिलियन डॉलर्सने वाढल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना संकटाच्या काळात अमेरिकेत जेव्हा बेरोजगारीच्या दरात चढ उतार होत होते त्याच काळात या उद्योगपतींच्या उत्पन्नाचा आलेख सातत्याने वर गेल्याचे या वृत्तात सांगण्यात आले आहे. यात अमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉस यांचे उत्पन्न मार्च 2020 ते जून 2020 या काळात तब्बल 48 बिलीयन डॉलर्सने वाढले आहे. तर सध्या जगभरात वापरल्या जाणाऱ्या झूम या एपचे सीईओ एरिक युआन यांच्या उत्पन्नात या काळात 2.5 बिलीयन डॉलरची वाढ झाली आहे.

यावर अंकुश ठेवण्यासाठी काही तज्ज्ञांना सरकारला सल्ला दिला आहे. यामध्ये आपत्तीच्या काळात नफेखोरीला अंकुश लावण्यासाठी कायदा करता येईल, तसंच अतिरिक्त नफा लपवण्यासाठी बनावट कंपन्या दाखवल्या जातात, त्यावर अंकुश ठेवण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्स आणखी पारदर्शक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

अमेरिकेत आता अध्यक्षीय निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुऴे डोनाल्ड ट्रम्प यांनी गरिब आणि मध्यमवर्गाला आपल्याकडे वळण्यासाठी आर्थिक विषमतेवर उपाययोजनांची घोषणा तर केली आहे. पण प्रत्यक्षात स्वत: एक उद्योगपती असलेले ट्रम्प खरंच यावर कठोर निर्णय घेतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Similar News