देशात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक, 24 तासात 2812 मृत्यू

Update: 2021-04-26 05:19 GMT

गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ५२ हजार ९९१ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ झाली आहे. तर गेल्या 24 तासात देशात तब्बल 2812 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बळींची एकूण संख्या १ लाख ९५ हजार १२३ एवढी झाली आहे.

थोडी दिलासादायक बाब म्हणजे देशात गेल्या २४ तासांत कोरनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख १९ हजार २७२ एवढी नोंदवली गेली आहे. त्यामुऴे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संखघअया १ कोटी ४३ लाख ४ हजार ३८२ एवढी झाली आहे. देशात सध्या २८ लाख १३ हजार ६५८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज कोरोनाचे तीन लाखांच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. तर दररोज दोन हजारांच्यावर रुग्णांचा मृत्यू होत आहे. दरम्यान देशात लसीकरण झालेल्या रुग्णांची संख्या आता १४ कोटी १९ लाख ११ हजार २२३ एवढी आहे.

Tags:    

Similar News