मुंबई महापालिकेत २९९ कोटींचा घोटाळा – आशिष शेलार

Update: 2019-12-19 09:58 GMT

मुंबई महापालिकेत २९० रस्त्यांसाठी तब्बल ८३६ कोटी रुपयांचे कंत्राट ४० टक्के जास्त दराने देण्यात आले आहे. यामध्ये २९९ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत केला. त्याचवेळी मराठा आणि कुणबी समाजासाठी स्थापन झालेल्या ‘सारथी’ चे अनुदान बंद करून ही संस्था बंद करण्याचा घाट नव्या सरकारकडून घातला जाटत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

विधानसभेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना राज्यपालांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्याला विरोध करताना आमदार आशीष शेलार यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. ठाणे शहरातून राज्याचे गृहमंत्री आले आहेत त्या ठाणे शहरात एका आठवड्यात चार मुलींच्या अपहरण झाल्याची घटना घडली आहे. तर नालासोपारा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बापाचा निर्घुण पध्दतीनं खून केल्याची घटना वाकोला येथे घडली.

कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर एका बॅगेत मृतदेह सापडला, तो खूनही बावीस वर्षीय मुलीच्या बापाने केल्याचं उघड झालं. पोलिसांनी मारलेल्या छाप्यामध्ये ५ कोटी ६० लाख रुपयांचा एमडी ड्रगचा साठा हस्तगत करण्यात आला. चुनाभट्टी येथे हिट अँड रन प्रकरणांमध्ये अर्चना पारटे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचप्रमाणे जळगाव जामोद, खेर्डा येथे दिव्यांग मुलीची हत्या करण्यात आली तर अमेरिकेतून भारतात सुट्टीसाठी आलेल्या सुनेची हत्या वसईमध्ये घडली, तसंच नालासोपारा येथे ८ वी मध्ये शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करण्यात आला असून राज्यातील अनेक घटनांचे उल्लेख करत आशिष शेलार यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्ण बिघडली असून तातडीने या गोष्टींकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी केली.

रांज्यांत महिला सुरक्षित नाही त्या रांज्यांत राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनाचा प्रस्ताव आल्यावर आम्ही त्याला पाठिंबा कसा देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उल्हासनगर येथील 32 वर्षीय प्रियांका गुप्ता या महिलेने रात्री उशिरापर्यंत ज्युस सेंटर सुरू ठेवले म्हणून तिच्या पतीला आणि तिला अटक करण्यात आली. पोलिसांकडून वीस हजार रुपयांचा हप्ता मागविण्यात आला आणि या प्रकरणाचा न्याय मागण्यासाठी प्रियांका गुप्ता या महिलेला मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारावी लागली. अशी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची बिघडलेली परिस्थिती मांडत आमदार आशिष शेलार यांनी लक्ष वेधले.

राज्यपालांचे अभिभाषणामध्ये सर्व समाजाच्या लोकांना न्याय देणार असा मुद्दा मांडला आहे. मात्र भाजप सरकारच्या काळात मराठा समाजच्या मोर्चा नंतर सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेल्या ‘सारथी’ या संस्थेला यापुढे एक रुपयाही दिला जाणार नाही असा जीआर ६ डिसेंबर रोजी काढून या सरकारने ही संस्था जणू बंद करण्याचा निर्धार केलायं. तसंच या सरकारच्या काळात नुकताच झालेला घोटाळा उघड करताना त्यांनी सांगितले की मुंबईतील ४१५ रस्त्यांच्या कामासाठी ८६२ कोटींची निविदा मुंबई महापालिकेकडून मागवण्यात आली, पण त्यापैकी २९० रस्त्यांच्या रस्त्यांची कामे अंदाजे ८३६ कोटीला म्हणजेच अधिक ४० टक्के दराने देण्‍यात येणार यामध्ये २९९ कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

राज्यपालांचे अभिभाषणा प्रंसगी आशिष शेलार यांनी गदिमा, पु. ल. देशपांडे आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम घेणार असल्याचं सांगीतले. मराठीच्या पाठ्यपुस्तकात लेखक कवींच्या कविता घेतल्या जातात, त्यांना केवळ पाच हजार रुपये सात वर्षांसाठी म्हणजेच महिन्याला ६० रुपये मानधन दिले जाते ही बाब सुद्धा चिंताजनक आहे असं मत आशिष शेलार यांनी व्यक्त केल.

Similar News