कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २४७ कोटी जमा

Update: 2020-04-16 19:36 GMT

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राज्य पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कोराना विषाणूविरुद्ध लढताना आपली एकजूट, सहकार्याचे हात आणि मोलाची साथ मला अपेक्षित आहे अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. याच भावनेला राज्यातील दानशूर जनतेने मोठा प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंत २४७ कोटी रुपये जमा झाले आहेत.

कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात आता महाराष्ट्रातील जनता शासनासोबत सहभागी होत आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून अनेक सेलेब्रिटी, मान्यवरांनी या आपला सहभाग निधी दिला आहे. यासोबतच अनेक संस्था पुढे येत असून ज्यांना जी जी मदत करणे शक्य होते त्यांनी त्या मदतीसाठी हात पुढे केले. मदतीचे धनादेश, वस्तू, अन्नधान्याचा पुरवठा, गोरगरीब-अडकून पडलेल्या जनतेच्या जेवणाची व्यवस्था अशा वेगवेगळ्या स्वरूपातून मदतीचे हे हात पुढे येत आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19 हे स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch,

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

Similar News