परदेशातून आलेले २२७ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह- केंद्र सरकार

Update: 2020-06-06 01:30 GMT

कोरोनामुळे (corona) जगातील विविध देशांमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांना सरकारने वंदे भारत मिशन अंतर्गत परत आणले आहे. पण परतलेल्या ५९ हजार ८६७ प्रवाशांपैकी २२७ प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती केंद्र सरकारने मुंबई हायकोर्टात दिली आहे. परदेशात अडकलेल्या प्रवाशांना परत आणताना एअर इंडियाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नसल्याचा आरोप देवेन कनानी या पायलटने केला आहे आणि त्यासंदर्भात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याच याचिकेवरील सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे झाली. त्यावेळी सरकारने कोर्टात ही माहिती सादर केली आहे.

हे ही वाचा...


कोरोनावरील लसीचे २० लाख डोस तयार : ट्रम्प

जिकडे तिकडे आनंद गडे!

लॉकडाऊन नंतरचे ऑनलाइन शालेय शिक्षण

या विशेष विमानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळले गेल्याचा दावा सरकारने कोर्टात केला.

पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे प्रमाण ०.३८ टक्के एवढेच असल्याचा युक्तिवाद सरकारच्या वतीने करण्यात आला. तर याचिकाकर्त्यांचे वकील अभिषेक पनीकर यांनी सरकारने महाराष्ट्र, दिल्ली आणि तेलंगणामध्ये परतलेल्या १८ हजार ८९६ प्रवाशांची माहिती दिलेली नाही असा दावा करत पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी जास्त असू शकते असा युक्तिवाद केला.

या प्रवाशांना विमानात बसण्याआधी किंवा बसवल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झालेला नसून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आल्यानंतर संसर्ग झाल्याचा दावा सरकारने केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर हायकोर्टाने सरकारला नागरी उड्डाण विभागातील तज्ज्ञांची समिती नेमून केवळ स्पर्शाने कोरोनाचा संसर्ग होतो का, याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

Similar News