'हे' आहेत महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पातील १६ महत्त्वाचे निर्णय

Update: 2020-03-06 07:55 GMT

महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (6 मार्च) विधानसभेत सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सकाळी अकरा वाजता अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात जाहीर केलेले काही महत्तवाचे निर्णय पुढीलप्रमाणे...

१. 2 हजार 110 कोटींचा निधी महिला व बालकल्याण विभागाला देण्यात येणार आहे. महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल.

२. आमदार निधी दोन कोटींवरुन तीन कोटींचा केला आहे.

३. स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी सरकार आग्रही भुमिका घेत असून, ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना

मिळण्यासाठी कायदा करणार

४. नाट्यसंमेलनासाठीच्या निधीत वाढ, 10 कोटींचं अनुदान

५. जिल्हा वार्षिक योजनेसाठी 9800 कोटींची तरतूद, तृतीयपंथीयांसाठी वेगळ्या मंडळाची स्थापना, त्यासाठी 5 कोटी रूपयांची तरतूद

६. नव्या बसेस विकत घेण्यासाठी तसेच बस डेपो विकसित करण्यासाठी 400 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार, तसेच जुन्या बस बदलून नव्या अत्याधुनिक बस उपलब्ध करून देण्यात येणार

७. प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचं सरकारचं ध्येय, तरूणांसाठी नवीन उद्योग उभारणीसाठी मदत करणार, बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देण्यावर सरकारचा भर

८. दुर्गम भागात आरोग्य सेवा देणार, प्राथमिक आरोग्यासाठी 5 हजार कोटींचा निधी

९. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला, ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मोठी योजना हाती घेण्यात येणार आहे. एक हजार कोटींपेक्षा अधिक निधी प्रस्तावित.

१०. सर्व ग्रामपंचायतींना 2024 पर्यंत स्वत:चं कार्यालय असेल, सोलापूर आणि पुण्यात नवीन विमानतळ उभारणार.

१२. 10 हजार 35 कोटी जलसंपदा विभागासाठी निधी, राज्यातील भूजल पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न

१३. पायाभूत सुविधांची किंमत 2 लाख 48 हजार कोटी, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न

१४. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रक्कम प्रोत्साहनपर देणार

१५. सर्व घटकांचा विकास व्हावा हा उद्देश, जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देण्यावर भर

१६. स्वारगेट ते कात्रजपर्यंत पुणे मेट्रोचा विस्तार करणार

 

 

Similar News