ऑन ड्युटी व्हॉट्सअप वापरणाऱ्या शिक्षकांचं पाहा काय झालं?

Update: 2020-01-29 16:01 GMT

लहान मुलांच्या मोबाईल वेडाची चर्चा सगळे करतात पण मोठ्यांनाही मोबाईलचं व्यसन सोडता येत नाही अशी परिस्थिती आज आहे. असाच प्रकार घडलाय लातूर जिल्हा परिषदेच्या शाळेत. इथं शिक्षक वर्गातही सतत व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी पालकांकडे केल्यानंतर पालकांनी याबाबतची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली.

यानंतर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधीत शिक्षकांचे मोबाईल तपासल्यानंतर लातूर जिल्ह्यातील 13 शिक्षक कार्यालयीन वेळेत whats app चॅटिंग करणे, status बदलणे यात गर्क असल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे या 13 शिक्षकांना निलंबित कऱण्यात आले आहे. तसंच सर्व मुख्याध्यापकांनी याबाबत आपापल्या शाळांमध्ये तपासणी करून अहवाल सादर करावा असे आदेशही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Similar News