राज्यात आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात; विद्यार्थ्यांना १० मिनिटे मिळणार वाढवून

Update: 2024-03-01 06:05 GMT

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधील १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टकोन ठेवून तणावमुक्त वातावरणात ही परीक्षा द्यावी, असं आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

ही परीक्षा राज्यात एकुण ५ हजार ८६ केंद्रावर घेण्यात येणार असून सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी राज्य मंडळाने यादृष्टीने विविध उपाययोजना केलेल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता लागली तरी, परीक्षेवर त्याचा परिणाम होणार नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा एकुण नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहे.

त्याचबरोबर, यापूर्वी परीक्षा सूरू होण्याअगोदर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी बोर्डाकडून दिली जाणारी अतिरिक्त १० मिनिटे यावर्षी दिली जाणार नाहीत. याउलट आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शेवटी प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अधिकचे १० मिनिटे मिळणार आहेत. गतवर्षीप्रमाणेच मार्च २०२४ परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर हे अधिकचे दहा मिनिटे वाढवून मिळणार आहेत. 

Tags:    

Similar News