मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे ED समोर हजर, चौकशीला सुरूवात

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay) दिल्लीत ED च्या चौकशीसाठी (५ जुलै) हजर झाले आहेत. पण हे प्रकरण नेमकं काय आहे?

Update: 2022-07-05 06:52 GMT

संजय पांडे हे ३० जून ला मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले होते. त्यानंतर तीनच दिवसात संजय पांडे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. त्याप्रकरणी मंगळवारी संजय पांडे ईडीसमोर हजर झाले आहेत. तर चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

चित्रा रामकृष्ण प्रकरणात एका ऑडिट कंपनीचा उल्लेख आला आहे. कंपनी संजय पांडे यांची असल्याचे उघड झाले होते. तसेच अनिल देशमुख प्रकरणा परबमीर सिंग यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप पांडे यांच्यावर आहे. या दोन्ही प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले जाते आहे.

संजय पांडे यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी एक आयटीसाठीची ऑडिट कंपनी सुरू केली होती. याच कंपनीला सुमारे १० वर्षांनंतर NSE सर्व्हर- सिस्टीमचे ऑडिटचे काम देण्यात आले होते.

संजय पांडे यांनी आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात पॉक्सो संदर्भात काढलेला जीआर वादग्रस्त ठरला आहे. यानंतर त्यात सुधारणा केली गेली, पण त्यावरही आक्षेप घेण्यात येत आहेत.

आता संजय पांडे यांच्यावर ED काय कारवाई करते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण राज्यातील अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस आलेल्या असताना वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्याला निवृत्तीनंतर ३ दिवसातच नोटीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

Tags:    

Similar News