आसाममध्ये भाजप दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार का?

Update: 2021-05-02 02:49 GMT

आसामसह पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. जसेजसे निकाल समोर येईल त्याप्रमाणे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र सर्वांच लक्ष लागलं आहे ते म्हणजे भाजप आसाममध्ये पुन्हा सत्तेत कायम राहणार का?

आसामच्या 331 मतमोजणी केंद्रावर तिहेरी सुरक्षा उपाय योजना करण्यात आल्या असून, 35 हजार निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.मतमोजणी सुरू होण्यापूर्वी सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी सॅनिटायझ करण्यात आल्या.

एग्जिट पोलमध्ये आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत परत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एनडीटीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला राज्यातल्या 126 जागांपैकी 72 जागा मिळू शकतात. तर कॉंग्रेसच्या नेतृत्वात युतीला 53 जागा मिळतील असा अंदाज आहे.

त्यामुळे आता भाजप आपली सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. निवडणुकीच सर्व चित्र निकालानंतर स्पष्ट होईल.

Similar News