मतदान बुथवर जाताच पतीच्या आठवणीने प्रतिभाताई झाल्या भावूक...!

प्रत्येक वेळी पतीसोबत मतदान करायला यायचे पण दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांची कमी क्षणोक्षणी जाणवत आहे, असं म्हणत प्रतिभाताई बाळु धानोकरांच्या आठवणींने भावूक झाल्या.

Update: 2024-04-19 05:04 GMT

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर या मतदान करण्यासाठी आल्या असता त्यांचे दिवंगत पती बाळु धानोरकर यांच्या आठवणींने भावूक झाल्या.

यावेळी, बोलताना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, एका बाजूला आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा तर दुसऱ्या बाजूला दुखाःचा सुध्दा आहे. चंद्रपूर लोकसभा असलेल्या लोकमान्य शाळेच्या बुथवर मी आणि दिवंगत खासदार बाळु धानोरकर जोडीने मतदान करण्यासाठी यायचो. पण आज ते नसल्याचे दुःख क्षणोक्षणी जाणवत आहे. परंतू ज्या गोष्टी नशिबात असतात ज्या घडतंच असतात, त्यामुळे समोर येणाऱ्या अडचणींचा सामना करत मी ही निवडणूक लढवत आहे. खऱ्या अर्थाने आज हा लोकशाहीचा उत्सव असून मोठ्या संख्येने सगळ्यांनी या उत्सवात सहभागी व्हा, असं म्हणत प्रतिभा धानोरकर यांना अश्रू अनावर झाले.

देशात किती लोक बजावणार मतदानाची जबाबदारी?

राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात असलेल्या मतदानास आज सुरुवात झाली आहे. देशभरातून आज साधारपणे १६ कोटी ६३ लाख मतदार या टप्प्यात आपल्या मतदानाच हक्क बजावणार आहेत. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियम व अटीचे पालन करत ही मतदानप्रक्रिया अत्यंत शिस्थीत पार पडत असल्याचं चित्र आहे.

महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यात असलेल्या विदर्भातील ५ मतदारसंघात आज मतदान सुरू आहे. त्यामध्ये नागपूर, भंडारा-गोंदिया, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघाचा समावेश आहे.

Tags:    

Similar News