मेहनतीच्या जोरावर महिलेने शून्यातुन उभारले विश्व

आज जागतिक महिला दिनाच्या (International Women's Day) निमित्ताने हिंगणघाट तालुक्यात गृहीणी म्हणून काम करणाऱ्या सारिका भगत (Sarika Bhagat) यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक बचत गट स्थापन एक आदर्श निर्माण केला आहे. वाचा त्यांची यशोगाथा...

Update: 2023-03-08 09:29 GMT

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामध्ये राहत असणारी सर्वसाधारण घरातील महिला सारिका भगत ही सर्वप्रथम गृहिणी म्हणून घरी काम करत होती. नंतर बचत गटाच्या माध्यमातून बचत गट स्थापन केले. काही दिवस बचत गटामध्ये काम केल्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून बँक सखी (Bank Sakhi) म्हणून सारिका भगत यांची निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी अथक परिश्रम घेऊन घरीच ग्राहक सेवा केंद्र उघडले. त्यानंतर बँक मधील पैशासंदर्भातील सर्व काम बँक पासबुक, बॅक वीमा काढणे, महिलांना बॅंक विषयक माहिती देणे, बँकेतील योजनेबाबत माहिती सांगणे. इत्यादी कामे ग्राहक सेवा केंद्राच्या (Customer Service Centre) माध्यमातून सारिका भगत करत आहेत.

आज समाजापुढे वेगळा आदर्श ठेवण्याचे काम सारिका भगत करत आहेत. कारण चूल व मूल न सांभाळता चार भिंती पलीकडे जावून सारिका भगत यांनी भारतीय स्टेट बँक (State Bank of India) मध्ये काही दिवस काम केले. त्यानंतर घरच्या परिस्थितीवर मात करून घरीच एक रूम बांधकाम करून ग्राहक सेवा केंद्र स्थापन केले. जिद्द व चिकाटीच्या जोरावर सारिका भगत बँक सखी (Bank Sakhi) म्हणून गावात व समाजात आदर्श महिला ठरल्या आहेत. प्रत्येक महिलांनी कठीण दिवसात मिळेल ते काम आणि परिश्रम करून जिद्द व मेहनतीच्या जोरावर प्रत्येक स्वप्न केले पाहिजे, असा संदेश बँक सखी (Bank Sakhi) सारिका भगत यांनी महिलांना दिला आहे.

Tags:    

Similar News