विकिपीडिया होणार 'स्वस्थ' !

Update: 2020-01-20 07:51 GMT

इंटरनेटच्या या वेगवान जगात विकिपीडीया हा माहितीचा महत्वपूर्ण स्त्रोत समजला जातो. अनेक गोष्टींबाबत माहितीसाठी रोज हजारो लोक विकिपीडियाची मदत घेतात. यात आजाराशी संबंधीत माहितीसाठीही अनेक लोक गुगलचा वापर करतात. खरंतर आजाराबाबत माहिती ही जागतिक आरोग्य संघटनेच्या, सरकारच्या वेबसाईटवर असते आणि अधिक लोकांनी तिथे जाऊन माहिती घेणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नाही, उलट अधिकाधीक लोक हे विकिपीडियावर आजारासंबंधी माहिती शोधत असतात.

त्यामुळेच आता आरोग्यासंबंधी योग्य ती माहिती वाढवण्याचा निर्णय विकिपीडियनं घेतला आहे व त्यासाठीच ‘स्वास्थ’ ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. विकिपीडियावर जाऊन योग्य माहिती संदर्भासह कशी देता येईल, या मोहीमेचा फायदा कसा होईल याबद्दल विकीपिडीयाच्या स्वस्थ मोहिमेचे डायरेक्टर अभिजीत सूर्यवंशी यांनी माहिती दिलीये.

Similar News